औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी अध्यक्ष असलेल्या रेशन दुकानदार संघटनेच्या मोर्चात मोदी सरकारचा धिक्कार करणाऱ्या घोषणा देतांना आंदोलकांचे ताळतंत्र सुटले. क्रांतीचौकात मोर्चा सुरु होण्यापूर्वी काही अतिउत्साही कार्यकर्ते आणि महिलांनी मोदींना शिवीगाळ करणाऱ्या घोषणा दिल्या.
मोदींच्या नेतृत्वातील मोर्चात मोदींनाच शिवीगाळ
रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीचौक येथून ऑल
इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. प्रल्हाद मोदी
मोर्चाचे नेतृत्व करणारे इतर नेते येण्यापूर्वी काही उत्साही रेशनदुकानदारांनी
पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारचा धिक्कार असो, या
घोषणेने कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. याचवेळी एकाने ‘कोण कहेता है ये सरकरा अच्छा है,
मोदी तो XXX बच्चा है’ अशी घोषणा दिली. यावेळी काहींनी
अवाक् होऊन त्या कार्यकर्त्याकडे पाहिले. त्यानंतर लागलीच महिलांनी असंसदीय भाषेत
काही घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांची ही घोषणाबाजी सुरु असताना मीडियाच्या कॅमेरे
आपल्याकडे आहेत, याचेही भान त्यांना नव्हते.
प्रल्हाद मोदी पोहोचण्यापूर्वी घोषणाबाजी
पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली यांच्यावतीने औरंगाबादे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे व औरंगाबाद जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांचाही सहभाग आहे. या धिक्कार मोर्चात डीबीटी रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व प्रल्हाद मोदी, विश्वंभर बसू, डी.एन. पाटील यांनी केले. हे नेते क्रांतीचौकात येण्यापूर्वी उत्साही कार्यकर्त्यांनी अससंदीय भाषेत घोषणा देऊन मोदींचा त्यांच्या भावाच्याच नेतृत्वात निघणाऱ्या मोर्चात उद्धार केल्याची चर्चा होती.










